गोलाणी मार्केटमध्ये 11 जणांना जुगार खेळतांना पकडले

0

जळगाव : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केटच्या वरील मजल्यावर 11 जुगारी झन्नामन्ना व जुगार खेळत होते. त्यांना शहर पोलीसांनी दुपारी 12 वाजता जुगार खेळतांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून 2410 रूपयांचा मुद्देमाल व जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी शहर पोलिसात पो.ना. सुधीर संजय साळवे यांच्या फिर्यादीवरून या जुगार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारी 12 वाजेच्या सुमारास पोलिसांचा छापा
गोलाणी मार्केटमधील वरच्या मजल्यावर आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहर पोलिसांना या ठिकाणी अवैधपणे 10 ते 12 तरूण तरूण पत्ते खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानंतर एएसआय वासुदेव सोनवणे, पोकॉ अमोल विसपुते यांनी लागलीच गोलाणी मार्केट गाठले. घटनास्थळावर जावून पाहणी केली असता या ठिकाणी राजू गुलशन तडवी (रा. धनगरवाडा), इरफान खान सलमान खान (रा. शिवाजीनगर), हासिम खान समशेर खान पठाण (रा. आदर्शनगर), इम्रान खान गुलाब खान (रा. भारत नगर), राजेश मोतीलाल रोडे (रा. राजमालतीनगर), लिलाधर डिगंबर जोशी (रा. जोशी कॉलनी), यशवंत भानुदास सुरवाडे (रा. के. सी. पार्क), संजय राजाराम नन्नवरे (रा. गेंदालाल मिल), रवींद्र बळीराम भालेराव (रा. भारतनगर), सागर दिलीप सोनवणे (रा. जानकीनगर), गौतम शामराव सावळे (रा. पिंप्राळा हुडको) हे 11 जण झन्नामन्नाचा नावाचा पत्ता जुगार खेळतांना आढळून आले. या 11 जणांना वासुदेव सोनवणे यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून 2410 रूपयांचा मुद्देमाल व जुगार खेळण्याचे साहित्य पोलीसांनी हस्तगत केले. तसेच पो.ना. सुधीर संजय साळवे यांच्या फिर्यादीवरून या जुगार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.