गोलंदाज ठाकूर पुणे सुपरजायंट्सच्या ताफ्यात

0

मुंबई । आयपीएल 10 मध्ये पुणे सुपरजायंट्स या सिझन मध्ये सर्वाधिक प्रसिध्द झोतात आले आहे.प्रथमच या संघाने महेंद्रसिंग धोनी याला कर्णधार पदावरून खाली उतारून स्टीव्ह स्मिथ नेतृत्व खेळणार आहे.याचबरोबर या सिझनमध्ये वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पुणे सुपरजायंट्सच्या गोटात सामील झाला आहे. किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा शार्दूल ठाकूरला पुणे सुपरजायंट्सनी विकत घेतले आहे.

पुण्याने दिल्लीशी असाच थेट व्यवहार केला होता
किंग्स इलेव्हन पंजाबने 2014 सालच्या लिलावात शार्दूल ठाकूरवर यशस्वी बोली लावली होती. पण यंदा दहाव्या आयपीएल मोसमाच्या निमित्ताने रायझिंग पुणे सुपरजायंट्सने किंग्स इलेव्हन पंजाबशी थेट व्यवहार करुन त्यांच्या ताफ्यातल्या शार्दूल ठाकूरला विकत घेतले आहे.पुणे सुपरजायंट्सचा हा दुसरा व्यवहार असून, याआधी पुण्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून मयांक अगरवालला विकत घेतले आहे.

आयपीएलच्या दहाव्या मोसमाचे यंदा 5 एप्रिल ते 21 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. पहिला सामना 5 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येईल, तर टूर्नामेंटचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये 21 मे रोजी खेळवण्यात येईल.