गोरखपूर ते मुंबईसाठी तीन विशेष गाड्या

0

भुसावळ : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गोरखपूर ते मुंबई दरम्यान तीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून 16 डिसेंबरपासून या गाड्यांना सुरुवात करण्यात आली आहे.

असे आहे वेळापत्रक
यामध्ये 15063 गोरखपूर-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस ही गाडी दरसोमवारी गोरखपूर येथून सकाळी 5.30 वाजता रवाना होवून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 4.20 ला पोहचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 15064 लोकमान्य टिळक-गोरखपूर एक्स्प्रेस ही दर मंगळवारी संध्याकाळी 5.50 वाजता रवाना होवून सकाळी 3.15 ला गोरखपूर येथे पोहचेल. दरम्यान ही गाडी आनंदनगर, नवगड, शोहरतगड, बर्‍हानी, तुलसीपूर, झारखंडी, बैरामपूर, कोंडा, बाराबांकी, लखनऊ, कानपूर, ओराई, झांसी, विदिशा, हबीबगंज, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, इगतपुरी, कल्याण, ठाणे या स्थानकांवर थांबेल. गाडी क्रमांक 15065 गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ही गाडी रविवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार ला गोरखपूर येथून सकाळी 5.30 वाजता रवाना होवून दुसर्‍या दिवशी पनवेल येथे दुपारी 4.20 वाजता ला पोहचेल. दरम्यानच्या प्रवासात ही गाडी आनंदनगर, नवगड, शोहरतगड, बर्हानी, तुलसीपूर, झारखंडी, बैरामपूर, कोंडा, बाराबांकी, लखनऊ, कानपूर, ओराई, झांसी, विदिशा, हबीबगंज, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासात 15066 पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार ला पनवेल येथून सकाळी 5.50 वाजता रवाना होवून दुसर्‍या दिवशी दुपारी 4.30 ला गोरखपूर येथे पोहचेल. गाडी क्रमांक 15067 गोरखपूर-बांद्रा एक्स्प्रेस ही दर बुधवारी तर 15068 बांद्रा-गोरखपूर एक्स्प्रेस ही दर शुक्रवारी धावेल. गोरखपूर येथून सकाळी 5.30 वाजता रवाना होवून बांद्रा येथे रात्री 8.05 ला पोहचेल. दरम्यानच्या प्रवासात ही गाडी आनंदनगर, नवगड, शोहरतगड, बर्हानी, तुलसीपूर, झारखंडी, बैरामपूर, कोंडा, बाराबांकी, लखनऊ, कानपूर, ओराई, झांसी, विदिशा, हबीबगंज, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वापी, बोरिवली या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासात ही गाडी बांद्रा येथून रात्री 8 वाजता रवाना होवून ती गोरखपूर येथे संध्याकाळी 5.50 ला पोहचेल.