Private Advt

गोजोरे येथील शेतकर्‍याची गळफास घेत आत्महत्या

भुसावळ : तालुक्यातील गोजोरा येथे शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. संजय तुकाराम जावळे (55) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी गोजोरे येथील राजेश विठोबा जावळे यांच्या खबरीनुसार तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

घरी कुणी नसताना आत्महत्या
संजय जावळे यांनी शुक्रवारी आपल्या राहत्या घरात लोखंडी हुकाला सुती दोरीने सकाळी 10 वाजेपूर्वी गळफास घेतला. पोलिस निरीक्षक विलास शेंडे, ठाणे अंमलदार युनूस शेख, हवालदार दीपक जाधव, गणेश गव्हाळे, उमेश बारी यांनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आला. मयत शेतकरी संजय जावळे यांचे कुटुंब नागपूर येथे गेल्याने जावळे हे घरी एकटेच होते शिवाय मोठ्या मुलीचा शुक्रवारी दहावीचा निकाल होता व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली मात्र अचानक शेतकर्‍याने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परीवार आहे. पुढील तपास हवालदार गणेश गव्हाळे करीत आहेत.