गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन ट्रकची धडक; ४ जणांचा मृत्यू

0

गोंदिया : देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने ४ जणांचा मृत्यू तर १ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. रवि यादव ३०, रा. महारुमकला, जिल्हा राजनांदगाव, जावेद हाला, बाकानेर गुजरात व दोन अनोळखी इसमांचा मृतांमध्ये समावेश आहे. आशिक नाथाभाई समा असे गंभीर असलेल्या चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक जीओ-4,टीए-९९०२ हा ट्रक रायपूर कडून नागपूरकडे जात होता तर जीजे-०३,ए२-२८४५ हा ट्रक देवरीवरुन रायपूरकडे जात होता. दरम्यान देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ दोन्ही ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही ट्रकच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या अपघाताची माहिती सिरपूर सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी देवरी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत जखमीला देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अपघातात मृत्यू झाल्यांपैकी दोन जणांची ओळख पटली असून दोन जणांची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Copy