गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाचे ३० हजारहून अधिक रुग्ण

0

मुंबई : जगभरातील १७७ देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाचे ३० हजारावर नवे रुग्ण आढळले असून १ हजार ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या इटलीत गेल्या २४ तासात तब्बल ६२७ जणांचा बळी गेला आहे. इटलीत गेल्या 19 दिवसात ३ हजार ९५० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही मृत्यांचा आकडा एक हजारहून अधिक झाला आहे. गेल्या २४ तासात स्पेनमध्ये २६२जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या १३ दिवसात १ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाखांवर गेला आहे. तर ११ हजार ३८५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करुन ९२ हजार रुग्ण बरेही झाले आहेत. तर सात हजारांहून अधिक रुग्णांची स्थिती अद्याप गंभीर आहे.

भारत देशातील २० राज्यांना कोरोना विषाणूचा फटका बसला आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ५२ रुग्णांना लागण झाली आहे. यामध्ये तीन परदेशी लोकांचा समावेश आहे. यानंतर केरळमध्ये २८ संसर्गजन्य लोक असून दोन विदेशी नागरिक आहेत. या दोन राज्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये २२, हरियाणामध्ये १७, कर्नाटकात १५, दिल्लीमध्ये १७, लदाखमध्ये १०, तेलंगणामध्ये १७, राजस्थानमध्ये १, जम्मू काश्मिरमध्ये ४, तमिळनाडूमध्ये ३, ओडीशामध्ये २, पंजाबमध्ये २, उत्तराखंडमध्ये ३, आंध्रप्रदेश ३, बंगालमध्ये ३, चंदिगढमध्ये १, पद्दुचेरी १, गुजरातमध्ये ५ आणि छत्तीसगढमध्ये १ कोरोनाग्रस्त रुग्ण आहे.

Copy