गॅस कनेक्शनवरून ग्राहक, मॅनेजरमध्ये बाचाबाची

0

जळगाव । खान्देश मिल कॉम्प्लेक्स येथे असलेल्या रेखा गॅस एजन्सीमध्ये मंगळवारी सायंकाळी मॅनेजर व ग्राहकात जोरदार बाचाबाची होवून शिवीगाळ झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांनी परस्परविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

शहरातील ईश्वर कॉलनीत राहणारे अशोक दगडू कोल्हे (वय 60) हे मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांचे भाऊ सुनिल दगडू कोल्हे यांचे गॅस सिलेंडर का बंद केले याचा जाब विचारण्यासाठी रेखा गॅस एजन्सी येथे विचारपूस करीत असतांना संतापाच्या भरात रेखा गॅसचे मालक दिलीप चौबे, मॅनेजर रमेश तुळशीराम म्हसके व एकाने मिळून अशोक कोल्हे यांना शिवीगाळ केली. अशी तक्रार अशोक कोल्हे यांनी दिली आहे. तर रमेश तुळशीराम म्हसकर यांना अशोक दगडू कोल्हे व त्याच्यासोबत तीन साथीदार यांना शिवीगाळ केली असल्याचे म्हसकर यांच्या तक्रारीत म्हटले आहे.