गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता येणार अडचणीत

0

मुंबई । गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता पालिका अधिकार्‍यांवर दबाव टाकल्याप्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारवाई थांबवण्यासाठी मेहता यांनी अधिकार्‍यांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे.

अशोककुमार शामजी तवाडिया या पालिका अभियंत्याच्या अहवालात मंत्रिमहोदयांचा उल्लेेख आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचार्‍यांवर प्रकाश मेहतांनी दबाव टाकल्याचा आरोप केला जात आहे. मुंबईतील पाइपलाइन लगतच्या वाढत्या झोपड्यांविरोधात हायकोर्टात याचिका केली आहे. सामाजिक कार्यकर्ता भगवानजी रयानी यांनी ही याचिका दाखल केली आहे. एन वॉर्डात वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

टिळकनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकार्‍याला स्टेशन डायरीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हायकोर्टाने राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाधिवक्त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.