गुरे चोरणारी टोळी सक्रिय : यावलमधून वासरी लांबवली

यावल : शहरातील सुंदर नगरी भागात एका शेतकर्‍याच्या घराबाहेर बांधलेली पाच हजार रुपये किंमतीची वासरी तीन अज्ञात व्यक्तींनी पांढरा रंगाच्या गाडीत टाकून लांबवली. ही घटना रविवारी पहाटे पूर्वी घडली. या वाहनाचा पाठलाग केला असता ते भुसावळच्या दिशेने निघून गेले.

टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचा संशय
या प्रकरणी यावल पोलिसांत तीन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धनराज युवराज फालक हे शेतकरी सुंदर नगरीत राहतात. त्यांनी आपल्या घराबाहेर गाय आणि तिचे वासरू बांधले होते. शनिवारी ते कुटुंबासह घरात झोपले असताना रविवारी पहाटे दीड नंतर दोर कापून भामट्यांनी घराबाहेर बांधलेली वासरी पांढर्‍या रंगात वाहनात टाकून भामट्यांनी पळ काढला. तपास पोलिस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहेत.