Private Advt

गुरे चोरट्यांची टोळी जळगाव जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : धुळ्यातील गुरे चोरट्यांना जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे. तीन संशयीतांना अटक करण्यात आली असून त्यांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात गुन्ह्याच्या तपासासाठी सोपवण्यात आले. शाकीर शहा उर्फ पप्पू बंब इब्राहीम शहा (31, रा.आझाद नगर, भोईवाडा धुळे), सद्दाम उर्फ बोबड्या रशीद शेख (20, रा.बाबानगर, धुळे), नईम शहा सलीम शहा (25, भोईवाडा, वडजी रोड, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेर पोसिल ठाण्यात गुरे चोरी प्रकरणी गुन्हा दाखल असून त्यात संशयीत आरोपी शाकीर शहा उर्फ पप्पू बंब इब्राहीम शहा याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने आरोपीला धुळ्यातून अटक केली. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने साथीदार सद्दाम उर्फ बोबड्या रशीद शेख (20, बाबानगर, धुळे), नईम शहा सलीम शहा (25, भोईवाडा, वडजी रोड, धुळे) आणि सलमान ऊर्फ मन्या अन्सारी (कबीरगंज, धुळे) यांचाही सहभाग असल्याची कबुली दिली तर तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या मात्र सलमान ऊर्फ मन्या अन्सारी हा पसार होण्यात यशस्वी झाला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, हवालदार अश्रफ शेख निजामुद्दीन, सुधाकर अंभोरे, चालक हवालदार विजय चौधरी आदींच्या पथकाने केली.