Private Advt

गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराखीचा डोहात बुडाल्याने मृत्यू

जळगाव : गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराखीचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी गिरणा पंपिंग परीसरात उघडकीला आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुराखी केशव शंकर इंगळे (55, रा.सावखेडा, ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
केशव हा गुरे चारण्याचे काम करतो. रविवार, 13 मार्च रोजी सकाळी गुरे चारण्यासाठी घरातून बाहेर पडले. सायंकाळी उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठेही आढळून आले नाही मात्र सोमवारी सकाळी डोहात त्यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी उशीरा तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.