गुरु – शनीच्या महायुतीचा आज अद्भूत नजारा

0

सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरु आणि शनी हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले दिसणार

जळगाव: 21 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी सुर्यास्तानंतर पश्चिम दिशेला गेल्या चारशे वर्षात न दिसलेल्या गुरु आणि शनीच्या महायुतीचा (ॠीशरीं उेपर्क्षीपलींळेप) विलक्षण नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरु आणि शनी हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत. सूर्याभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी या दोन्ही ग्रहांना वेगवेगळा काळ लागत असला तरी दर 20 वर्षानी ते जवळ आलेले दिसतात. पण यावेळी विशेष म्हणजे ते खूपच जवळ येणार आहेत. साध्या डोळ्यांनी तर ते दिसणार आहेच पण टेलिस्कोप मधून गुरु त्याच्या चार चंद्रांसह आणि शनी त्याच्या कड्यांसह एकाच वेळी ही महायुती बघता येणार आहे. या आधी 16 जुलै 1623 अशी महायुती झाली होती आणि यानंतर 15 मार्च 2080 साली ही महायुती होईल.

खगोल प्रेमींसाठी आवाहन
महायुतीचा हा अदभूत नजारा 12 इंचच्या परावर्तीत दुर्बिणीतून संध्याकाळी 6.00 ते 7.30 यावेळेत मु. जे. महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या छतावर, जळगांव खगोलप्रेमी ग्रुप आणि मु. जे. महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने बघण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी या संधीचा आवश्य फायदा घ्यावा आणि त्यामागचे विज्ञान समजून घ्यावे. सध्या कोरोना असल्याने कार्यक्रमाल येतांना शासनाने दिलेल्या नियमानुसार मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तरी अधिक माहितीसाठी अमोघ जोशी (खगोल अभ्यासक, जळगांव) – प्रज्ञा जंगले (भूगोल विभाग प्रमुख, मु. जे. महाविद्यालय, जळगांव) संपर्क करावा.

युती आणि महायुती म्हणजे काय ?
ज्यावेळी दोन ग्रह किंवा चंद्र आणि ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला ‘युती’ (उेपर्क्षीपलींळेप) म्हणतात. पण महायुतीत ते खूपच जवळ आलेले म्हणजे एकमेकांना चिटकल्यासारखे वाटतात त्याला ‘महायुती’ (ॠीशरीं उेपर्क्षीपलींळेप) म्हणतात. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती वेगवेगळ्या अंतरावरून आणि वेगवेगळ्या वेगाने फिरत असल्याने त्यांना आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळा काळ लागतो. जसे गुरु ग्रह सूर्याभोवती 76 कोटी कि.मी. अंतरावरून 13 कि.मी प्रती सेकंद या वेगाने फिरतो. त्यामुळे त्याला आपली एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास 12 वर्ष लागतात आणि शनी ग्रह सूर्याभोवती 1 अब्ज 49 कोटी कि.मी. अंतरावरून 9.68 कि.मी प्रती सेकंद या वेगाने फिरतो. त्यामुळे त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास 29 वर्ष लागतात. गुरूचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग शनी पेक्षा जास्त असल्याने साधारण 20 वर्षांनी अशी एक वेळ येते कि गुरु शनीला पार करून पुढे जातो या पार करण्याच्या वेळी ते आपल्याला एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात. वास्तविक त्यांच्या अंतरात कोणताही बदल झालेला नसतो पण आपण त्यांना पृथ्वीवरून बघत असल्याने आपल्याला ते एकमेकांच्या जवळ आले आहेत असा भास होतो आणि आपल्याला युती किंवा महायुतीचा अदभूत दृश्य बघायला मिळते.

Copy