गुरुंना कार भेट देवून तनयने पाळला आपला शब्द

0

जळगाव । गुरु व समाजाप्रती कृत्रज्ञता व्यक्त करण्याची संस्कृती भारतात प्राचीन काळापासून पहावयास मिळते. आजच्या आधुनिक काळात देखील या परंपरेची प्रचिती येतच असते. नुकताच हा योग जळगावकरांना अनुभवण्यास मिळाला. इंडियाचा डान्स आयकॉन झालेलया व केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या ीारतातील नृत्यप्रेमी तरुणाईच्या गळ्यातील ताईत ठरलेला तनय मल्हाराला डान्स प्लस 2 या खाजगी वाहिनीवरल नृत्य स्पर्धेचा विजेता झाल्यानंतर बक्षीस म्हणून मिळालेली कार तनयने आपल्या गुररुना भेट दिली.

समाज, गुरु व जळगावकरांप्रती कृतज्ञता
नृत्य स्पर्धेता विजेता होऊन आपल्या जन्मभूमीत आगमन झाल्यानंतर जळगावमध्ये तनयचे अभूतपूर्व स्वागत करण्यात येऊन तयाच्या सत्कार समारंभात बक्षीस म्हणून मिळालेली कार गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरुंना भेट देण्याचे जाहीर वचन जळगावकरांसमोर दिले होते. सदर कार वाहिनीतर्फे नुकतीच त्याला देण्यात आल्यानंतर तनयने ती कार आपल्या गुरुंना भेट देऊन समाजासमोर चांगले उदाहरण घालून दिले. येथील सेंट टेरेसा शाळेत हा समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या समारीांत उपस्थितांसमोर तनयने समाज, गुरु व जळगावकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या शालेय मित्रांसमोर त्याने आदर्श उदाहरण उभे केले.

विजेता झाल्यानंतर बक्षीस म्हणून मिळालेल्या रक्कम पेकी काही रक्कम येथील सामाजिक संस्थांना दान करण्याचे वचन तनय दिले होते. सदर रक्कम अजून वाहिनीतर्फे मिळालेली नसून ती लवकरच मिळणार आहे. सदर रक्कम मिळाल्यानंतर लवकरच संस्थांना दान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. अशोक जैन, आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफना, तनयचे वडील व मल्हार कम्युनिकेशन्सचे संचालक आनंद मल्हारा, सेंट टेरेसा स्कुलचे प्रिन्सिपल ज्युलीट, सिस्टर मर्सी तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.