गुरांची अवैध वाहतूक रोखली : चार गुरांची सुटका, चालक पसार

फैजपूर : फैजपूर पोलिसांनी बुधवारी नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून चार गुरांची अवैधरीत्या होणारी वाहतूक रोखत या गुरांची सुटका केली. वाहन चालक वाहन सोडून पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी वाहन चालक रईस खान हमीद खान (न्हावी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयीताच्या ताब्यातील एक लाख रुपये किंमतीचे छोटा हत्ती वाहन तसेच 18 हजार रुपये किंमतीची चार गुरे ताब्यात घेतली आहे. बुधवारी पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना येथील छत्री चौकात फौजदार मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस नाईक किरण चाटे, बाळू भोई यांना वाहन तपासणीदरम्यान एका टाटा कंपनीच्या छोटा हत्ती वाहनात चार गोवंश जातीचे चार गुरे आढळली. पोलिसांना पाहताच चालकाने वाहन सोडून धूम ठोकली. पोलिसांनी वाहन व त्यातील चारही गुरे ताब्यात घेतल्यानंतर या गुरांना आमोदा येथील गोशाळेत हलवले. या प्रकरणी वाहन चालक रईस खान हमीदार खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश चौधरी करीत आहेत.

Copy