Private Advt

गुरांची अवैधरीत्या वाहतूक : 22 जनावरांची सुटका

मुक्ताईनगर : तालुक्यातील कर्की ते बेलसवाडी रस्त्यावर अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणार्‍या ट्रकला ग्रामस्थांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. या ट्रकमध्ये गायी आणि गोर्‍हे अशी 22 जनावरे कोंबून भरलेली होती. पैकी तीन गायी मृतावस्थेत आढळल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. कर्की येथील पोलिस पाटील दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत ट्रक (यूपी.5179) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, तो पसार झाला आहे. तत्पूर्वी, ग्रामस्थांनी कर्की ते बेलसवाडी रस्त्यावर थांबवलेल्या ट्रकची तपासणी केल्यावर 22 जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी ही जनावरे खाली उतरवली. त्यात तीन गायी दगावलेल्या आढळून आल्या. तपास सहाय्यक फौजदार माणिकराव निकम करत आहे.