Private Advt

गुन्हा दाखल न करण्यासाठी पारोळ्यातील औषध विक्रेत्याकडे मागितली 50 हजारांची खंडणी

चौघा संशयीतांविरोधात पारोळा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा

पारोळा : छेडछाड व अ‍ॅट्रासिटीबाबतचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मेडिकल दुकानदाराकडे 50 हजारांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
महेश धोंडू साळुंखे (31, आदर्श नगर, पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवार, 28 एप्रिल 2022 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयीत गणेश छगन मरसाळे, समाधान वसंत मरसाळे, बापू मरसाळे, माधुरी समाधान मरसाळे (सर्व राहणार डी.डी.नगर, पारोळा) हे नॅशनल हायवे क्रमांक वर रोडलगत असलेल्या शेतकी कॉम्प्लेक्समधील राजमुद्रा मेडीकलवर आले. यावेळी समाधान मरसाळे यांनी दुकानदार साळुंखे यांना तू थोड्या वेळापूर्वी संजय वाणी यांच्या आई एकवीरा किराणा दुकानात गेला व माझी पत्नी माधुरी हिचा पाठलाग करुन तिचेकडे मोबाईल नंबर का मागीतला, असे बोलत असतांना मी व माझा भागीदार हरीष भोसले असे आम्ही दुकानाबाहेर आलेा. त्यांना समजवित असतांना समाधान यास बोललो की, मी तुझ्या पत्नीला या पुर्वी पाहिले नाही व मी तिला ओळखत नाही व मोबाईल नंबर सुध्दा मागितलेला नाही. यावेळी समाधान वसंत मरसाळे, त्याची पत्नी माधुरी समाधान मरसाळे तसेच गणेश छगन मरसाळे (वकील), बापु मरसाळे असे माझे मेडीकल समोर जमा झाले व चारही जणांनी मला शिवीगाळ व धमकी देत हात व बुक्क्यांनी मारहाण केली. संशयीतांनी 50 हजारांची खंडणीची मागणी केली अन्यथा अ‍ॅट्रासिटी तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.