गुडमॉर्निंग पथकालाही मिळणार पोलीस बंदोबस्त

0

भुसावळ । शासनाने हागणदारीमुक्तीसाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने प्रशासनातर्फे देखील आपल्या स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास उघड्यावर बसणार्‍यांमध्ये जनजागृती करण्यासाठी गुडमॉर्निग पथकाद्वारे नागरिकांना समज दिली जाते मात्र कर्मचार्‍यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून या पथकासोबत पोलीस बंदोबस्त देखील दिला जाणार आहे.

वाद उद्भवत असल्यामुळे बंदोबस्ताची मागणी
यासंदर्भात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र दिले असून यानुसार आता गुडमॉर्निंग पथकासोबत त्या त्या क्षेत्रातील पोलिस स्थानकानुसार आवश्यक तो पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे. जिल्ह्यातील नगरपालिकांचा स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त करण्यासाीं सद्यस्थितीत कार्यवाही सुरु आहे. यासाठी नगरपालिका क्षेत्रात पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. या पथकास काही नागरिक जुमानत नसल्याचे दिसून येते. तसेच काही नागरिक वाद घालीत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. त्यामुळे या पथकासोबत पोलिस बंदोबस्त पुरविण्यात येण्यासंदर्भात प्रशासन विचाराधीन असल्याचे समजते.