गुडघ्याच्या दुखापतीमुळे युकीची उज्बेकिस्तानविरुद्ध माघार

0

नवी दिल्ली । गुडघ्याच्या दुखापतीमुळे युकीने सात एप्रिलपासून उज्बेकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणार्‍या लढतीतून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे डेव्हिस कप लढतीतून बाहेर झालेला भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू युकी भांबरीने सरावामध्ये कुठली उणीव नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला डेव्हिस कप एशिया ओशियाना गटातील लढतीत खेळता येणार नाही.

युकीने सांगितले की, ‘दुखापत गंभीर नाही, पण चुकीच्या वेळी उद्भवली आहे. मी या महिन्याचे अखेर पुनरागमन करणार आहे.’ तसेच दुखापतीमुळे संघाबाहेर राहणे मला आवडत नाही. माझ्या सरावामध्ये कुठली उणीव नाही, पण अनेकदा परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते, असेही तो म्हणाला. नॉन प्लेइंग कर्णधार महेश भूपतीला आता लिएंडर पेस किंवा रोहण बोपन्ना यांच्यापैकी एकाचा संघात समावेश करावा लागणार आहे.