गुजराल पेट्रोलपंप परिसरात संगीतमय श्रीमद् भागवत कथा

0

जळगाव । ओम शांतीःनगर महिला मंडळातर्फे गुजराल पेट्रोलपंप परिसरात असलेल्या शिवशंकर मंदिराचा 18 वा वर्धापनदिन असून या निमित्ताने 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन होईल. तर प्रमुखपदी आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकात शंकर कापसे उपस्थित राहतील. ह.भ.प. पंडित दत्तात्रय महाराज गुरव हे मधुर वाणीेेने कथा सादर करतील. सकाळी 6 ते 7.25 काकडाआरती, 7.30 वा आरती, दुपारी 2 ते 6 कथा निरुपण, 6 ते 7 हरिपाठ व विष्णूसहस्त्रपुराण, सायंकाळी 7.30 आरती होईल. 24 रोजी महाशिवरात्र सकाळी 3 ते 7 रुद्राभिषेक, 7, ध्वजभूषण, 7.30, 8 ते 11 यज्ञ (संचलन-गायत्री परिवार) 11 महाआरती, दुपारी 2 ते 5 कथा निरुपण, 5 ते 7 श्रीग्रंथराज मिरवणुक, 7.30 आरती यानंतर गोकुळ महाराज यांचे किर्तन होणार आहे.