‘गुंडांना प्रवेश देऊन भाजपाचे राष्ट्रीवादी केले जात आहे’

0

धुळे। भारतीय जनता पार्टींत आता संघ विरोधी गुंड प्रवृत्तीचे तडीपार, दरोडेखोर यासारखे गुन्हे दाखल असलेले आरोपी गुंड पक्षात घेणे म्हणजे पक्षातील चांगल्या, प्रामाणिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे, भाजपा पक्षाचा राष्ट्रवादी पक्ष करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अ‍ॅड. अमित दुसाणे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे.

काही संधी साधू भाजप पक्षात केवळ स्वार्थ साधण्यासाठी येत आहेत. राष्ट्रवादी पक्षात सर्व उपभोगल्यानंतर भाजपात येण्यामागे नक्कीच स्वार्थ आहे असा प्रश्‍न अ‍ॅड. दुसाणे यांनी उपस्थित केला आहे. त्या पक्षाशी प्रामाणिक राहिले नाही तर भाजपात येऊन प्रामाणिक निष्ठावंत राहतील याची खात्री बाळगावी? जे राष्ट्रवादी पक्षाला झाले नाहीत ते भाजप पक्षाला काय होणार म्हणून प्रामाणिक शिस्तबद्ध, संघविचारी भाजपाची कार्यपद्धती जपणारा कार्यकर्ता हे कदापी सहन करू शकत नाही असे अ‍ॅड. दुसाणे यांनी म्हटले आहे.