गीता मंदिरला मिळाला आदर्श शाळा पुरस्कार

0
भोसरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाच्यावतीने जोग एज्युकेशनल ट्रस्टच्या गीता मंदिर प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे या शाळेच्या शिक्षिका हस्लिम बाळासाहेब भालदार व आशा बसण्णा बनसोडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. मागील 52 वर्षापासून संस्कारक्षम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा अविरतपणे चालू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वात ज्येष्ठ व मानाची शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक आहे. या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते. उद्योजक, राजकीय नेते, पत्रकार, पोलीस, अभिनेते, शास्त्रज्ञ तसेच सैन्यात मेजक पदावर काम करीत आहेत, अशी माहिती जोग एज्युकेशनल ट्रस्टतर्फे देण्यात आली.
Copy