Private Advt

गिरणा नदी पात्रातून बैलगाडीने वाळूची चोरटी वाहतूक : दोघांविरोधात गुन्हा

चाळीसगाव : जामदा शिवारातील गिरणा नदी पात्रातून बैलगाडीने वाळूची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विना परवाना वाहतूक करताना कारवाई
चाळीसगाव तालुक्यातील जामदा शिवारातील गिरणा नदीपात्रातून वाळूची विनापरवाना वाहतूक करतांना सोमवार, 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मेहुणबारे पोलिसांनी दोन बैलगाड्या ताब्यात घेतल्या. संबंधितांकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याने या बैलगाड्या जप्त करण्यात आल्या. पोलिस कॉन्स्टेबल निलेश लेहार यांच्या फिर्यादीवरून बैलगाडी चालक अशोक भगवान महाले आणि सुरेश भगवान महाले (दोन्ही रा.जामदा, ता.चाळीसगाव) यांच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल पाटील करीत आहे.