गिरड येथील माजी सरपंचांचा भाजपात प्रवेश

0

भडगाव । तालुक्यातील गिरड येथील शिवसेनेचे माजी सरपंच कैलास सोनवणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात आपल्या समर्थक मित्रांसह प्रवेश केला. त्यांनी पाचोरा तालुक्यातील हरेश्वर पिंपळगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात खा.ए.टी.नाना पाटील व भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसे व शिवसेनेचे बापू धनगर, मधुकर पाटील, राजेन्द्र पाटील, रविंद्र पाटील, कोमल धनगर, नाना पाटील, योगेश बोरसे, समाधान पाटील सह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. सोनवणे हे 32 वर्षापासून निष्ठावान शिवसैनिक होते परंतु काही पदाधिकार्‍यांच्या हुकूमशाही व दडपशाहिला कंटाळून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदयबापु वाघ यांची जळगाव येथे भेट घेतली. तसेच पक्षाने गिरड – आमडदे गटाची उमेदवारी दिली. नाही दिली तरी भाजपाचेच काम करीन असेही त्यांनी प्रवेश करताना सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील, विधानक्षेत्र प्रमुख मधु काटे, सुभाष पाटील, वैद्यकीयसेल जिल्हा संयोजक डॉ.संजिव पाटील, गण प्रमुख लक्ष्मण पाटील, एम.ए. पाटील, शहरध्यक्ष शैलेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष विलास पाटील व विजय पाटील उपस्थित होते.