गावाच्या भल्यासाठी लोकनियुक्त सरपंचाचा अनोखा उपक्रम

0

गेल्या चार दिवसांपासून गावात करत आहे जनजागृती

चांदसर : देशासह राज्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घराबाहेर न निघण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील लोकनियुक्त सरपंच सचिन पवार हे गेल्या 4 दिवसापासून चांदसर येथे मुक्कामी राहून गावातल्या नागरिकांना घरा बाहेर न ।निघण्याचा सल्ला देत आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून गावात धूर फवारणी, स्वच्छता केली जात आहे.

दिवसातून तीन वेळा केली जाते घोषणा:- चांदसर येथील लोकनियुक्त सरपंच सचिन पवार हे आपल्या परिवारासोबत जळगाव शहरात राहतात. तेथून रोज चांदसर येथे ये- जा करत असतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण लॉक डाऊन ची घोषणा केल्यानंतर सचिन पवार यांनी गावात राहणे पसंत केले आहे. गावातील नागरिकांनी आपल्या घरातुन बाहेर पडू नये, या साठी ते स्वतः दिवसातून दोन, ते तीन वेळी माईक वर उद्घोषणा करत आहे.

ग्रामस्थांनी केले कौतुक

स्वतः सरपंच सचिन पवार हे गावात स्वच्छता करत आहे, हे पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची विचारणा केली जात असल्याने, ग्रामस्थांकडून सरपंच यांच्या कार्याला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. एकूणच कोरोना विषाणू बाबत चांदसर येथील सरपंच तसेच ग्रामस्थांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

Copy