Private Advt

गावठी पिस्टलासह दोघे आरोपी जाळ्यात

भुसावळात नाशिक आयजींच्या पथकाची कारवाई : कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात उडाली प्रचंड खळबळ

भुसावळ : शहरात नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई करीत गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळल्रूा. ईदगाह रोडवरील हिरा हॉलजवळ गुरूवारी सायंकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली. दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख ताहेर शेख आजाद आणि शेख रीजवान शेख इलियास (दोन्ही रा. मुस्लिम कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, 15 हजार रुपये किंमतीचे मोबाईल, 45 हजार रुपये किंमतीची रीक्षा मिळून 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहा.निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर गुलाब तडवी, रामचंद्र बोरसे, नाईक नितीन सपकाळे, नाईक प्रमोद मंडलिक, नाईक मनोज दुसाणे, चालक सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने केली.