गावठी पिस्टलासह जिवंत काडतुस बाळगणार्‍या तरुणाला जामनेरातून अटक

जळगाव गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून कारवाई : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भुसावळ/जळगाव : जामनेर शहरातून एका तरुणाला गावठी पिस्टल व एका जिवंत काडतुसासह जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार, 13 रोजी पकडले. संशयीताविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना जामनेर शहरातील खादगाव रोडवर एक संशयीत गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. गुरुवारी पथकाने संशयीत बाळू शामा पवार (21, रा.डोहरी तांडा, ता,.जामनेर) या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे 30 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करून जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार अशोक महाजन, हवालदार महेश महाजन, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, कृष्णा देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील, चालक हवालदार भरत पाटील यांच्या पथकाने केली.