गावठी दारू विक्रेत्यांविरूद्ध तालुका पोलिसांची धडक कारवाई : दिड लाखांचे रसायन नष्ट

0

भुसावळ : भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील गावठी दारू विरूद्ध सातत्याने कारवाईचा धडाका सुरू असून या कारवाईने अवैधरीत्या गावठी बनवणार्‍या विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. खंडाळा शिवारात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी एक लाख 33 हजार 450 रुपयांचे गावठी रसायन नष्ट करीत गुन्हे दाखल केले.

पोलिसांच्या कारवाईमुळे गावठी दारू विक्रेत्यांमध्ये भरली धडकी
खंडाळा शिवारात नाल्याजवळ बुधवारी रात्री नऊ वाजता इस्माईल छट्टू गवळी (शिवपूर कन्हाळा) हा गुळ महू नवसागर मिश्रीत रसायणची गावठी हात भट्टी चालवत असताना पोलिसांनी धाव टाकत सात ट्रकमधील एक हजार 300 लीटर कच्चे रसायन नष्ट केले तसेच 50 लिटर तयार दारू मिळून 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई खंडाळा शिवारात शेताच्या बाजूला सार्वजनिक जागी बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली. रशीद रन्नु गवळी हा गुळ महू नवसागर मिश्रीत रसायनांची गावठी भट्टी चालवत असतानाच पोलिसांनी 13 ड्रमधील दोन हजार 500 लीटर कच्चे रसायन नष्ट केले तसेच हात भट्टीची 55 लिटर तयार दारू मिळून 86 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईत 20 ड्रममधील तीन हजार 800 लीट ररसायन व गावठी हातभट्टीची दारूसह एकूण एक लाख 33 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ळी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, अजय माळी, प्रवीण पाटील, रीयाज काझी, प्रदीप इंगळे, संकेत झामरे, शिवपूर कन्हाळाचे पोलिस पाटील रेवसिंग पाटील, होमगार्ड रीतेश सेकोकारे, गोपाल पवार, भूषण पवा आदींच्या पथकाने केली.

Copy