गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी : रसायन जागेवरच केले नष्ट

Raid On Bodwad Gavathi Adda : Chemicals Worth 11 Thousand Destroyed बोदवड : बोदवड शिवारातील राधेश्याम वर्मा यांच्या शेताजवळील नाल्यात गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती बोदवड पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करीत दोन ड्रममधील कच्चे व गरम 400 लिटर रसायन तसेच हातभट्टीवरील 69 लीटर तयार तयार मिळून 10 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. संशयीत संतोष लालजी मोरे (52, रा.भिलवाडा, बोदवड) हा पोलिसांना पाहताच पसार झाला. या प्रकरणी मोरे विरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, हवालदार वसंत निकम, संतोष चौधरी, तुषार इंगळे, दीपक पाटील, मुकेश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास नाईक युनूस तडवी करीत आहेत.