गावठी दारूच्या वादातून पाडळेत एकाचा खून

0

रावेर : गावठी दारू पाडण्यावरून झालेल्या वादानंतर 32 वर्षीय इसमाचा तालुक्यातील पाडळे येथे खून करण्यात आला तर तुफान हाणामारीत दोघे जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मुराद तुराब तडवी (32) असे खून झालेल्या मयताचे नाव आहे. तुफान हाणामारीत सुलेमान तुराब तडवी व तुराब जाबाज तडवी हे कोयत्याने वार झाल्याने जखमी झाली आहेत. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस नेमक्या घटनेची माहिती जाणून घेत आहेत.

Copy