Private Advt

गावठी दारु विरोधात मुक्ताईनगर पोलिसांची वॉश आऊट मोहिम

मुक्ताईनगर : तालुक्यातील माणेगाव शिवारातील नदीच्या बेटाजवळ बेकायदेशीर सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टीवर मुक्ताईनगर पोलिसांनी छापा टाकत 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरुन कारवाई
मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तालुक्यातील माणेगाव येथे बेकायदेशीररीत्या दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी गुरुवार 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता धाड टाकली. या ठिकाणी दारू तयार करण्याचे कच्चे व पक्के रसायन पूर्णपणे नष्ट करण्यात आले तर एकूण 59 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी शांताराम जयराम बेलदार (रा.माणेगाव, ता.मुक्ताईनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयी आरोपी शांताराम बेलदार यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जाधव करीत आहे.