Private Advt

गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसासह तिघे धुळे एलसीबीच्या जाळ्यात

गोपनीय माहितीवरून कारवाई : एका संशयीताने पोलिसांच्या धाकाने गावठी कट्टा केला नष्ट

धुळे : स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारावर गावठी कट्टा बाळगणार्‍या व विक्री करणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयीतांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. हशीम हरुण पिंजारी उर्फ पापा गोल्डन (27, घर नं.341, पूर्व हुडको चाळीसगाव रोड, धुळे), परवेज आसीफ सैय्यद (26, गांधी चौक, निजामपूर, ता.साक्री) व राकेश भिका शेवाळे (38, जैताणे, ता.साक्री, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
आरोपी पापा गोल्डनकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्याकड्डील गावठी कट्टा नष्ट केल्याची माहिती दिली तसेच आपल्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत असल्याने त्याने पुरावा नष्ट केल्याची माहिती दिल्यानंतर आरोपीच्या ताब्यातील नाश केलेल्या कट्ट्याचे तुकडे व स्प्रिंग काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले तर एक कट्टा व पाच जिवंत काडतूस परवेज यास 15 हजारात विक्री केल्याचे सांगताच परवेज यास ताब्यात घेण्यात आले मात्र परवेजनेदेखील हा कट्टा 25 हजारात राकेश यास विक्री केल्याचे सांगितल्यानंतर त्यासदेखील अटक करण्यात आली तर राकेशने एका काडतूसचा शेतात फायर केल्याची कबुली दिल्याने रीकामी पुंगळी, चार जिवंत काडतूस व गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एलसीबी निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, गुलाब पाटील, प्रकाश सोनार आदींच्या पथकाने केली.