गावठी कट्टा विक्री प्रकरणी आरोपीला अटक

0

भुसावळ : भुसावळातील आरपीडी रोडवरील कब्रस्थानात 19 वर्षीय युवकावर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घडली घडली होती. या प्रकरणी नगरसेवक खरातसह सात आरोपींना अटक करण्यात आली होती तर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला कट्टा खडका येथील सचिन भीमराव वाघ (28) याने पुरवल्याची माहिती समोर आली होती. आरोपी हा नांदुरा येथील सासरवाडीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या सोमवारी मुसक्या आवळल्या.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील, कमलाकर बागुल, दादाराव पाटील, बाजारपेठचे कॉन्स्टेबल विकास सातदिवे आदींनी नांदुरा येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपी सचिन वाघ विरुद्ध यापूर्वी चैन चोरी तसेच आर्म अ‍ॅक्टचेही गुन्हे दाखल आहेत.

गोळीबारानंतर हादरले होते भुसावळ
तक्रारदार आदित्य संजय लोखंडे (19 न्यू आंबेडकर नगर,भुसावळ) याच्यावर खरात भावंडासह अन्य सात आरोपींनी गुरुवारी रात्री फायटरने मारहाण करून गोळीबार केला होता. आरोपींच्या अटकेनंतर गुन्ह्यातील कट्टा आरोपींनी सचिन वाघकडून घेतल्याची कबुली दिल्यानंतर पथकाने नांदुर्‍यातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीस भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Copy