गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह आरोपीला अटक

0

भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉन्स परीसरात एक संशयीत गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चंद्रकांत विनोद घेघंट (19, रा.वाल्मीक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 10 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा तसेच पाचशे रुपये किंमतीचे एक काडतूस जप्त करण्यात आले. दरम्यान, गत महिनाभरात शहरात तब्बल आठ कट्टे जप्त करण्यात आले असून सातत्याने होणार्‍या कारवाया पाहता जंक्शन शस्त्र तस्करीचे केंद्र तर ठरत नाही ना? असादेखील प्रश्‍न आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, नेव्हील बाटली, तुषार पाटील, उमाकांत पाटील, बंटी कापडणे, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे आदींनी केली. आरोपीविरुद्ध भाग 6 गुरनं.688/2020 आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.

Copy