गाळेधारकांचे 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

0

..तर 27 रोजी जेलभरो आंदोलन ; गाळेधारक कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

जळगाव – मनपा मालकीच्या मूदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना 26 नोव्हेंबरपर्यंत थकीत भाडे भरण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. मनपाच्या आदेशाविरोधात 14 मार्केटमधील गाळेधारक दि. 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा निर्णय बुधवारी झालेल्या गाळेधारक कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.मनपाने 27 ला कारवाई केल्यास दि.27 रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक बुधवारी छत्रपती शाहू मार्केटमध्ये घेण्यात आली. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, संजय पाटील, युवराज वाघ, विलास सांगोरे, सुरेश पाटील, पंकज मोमाया, वसिम काझी, राजेश समदाणी, राजेंद्र शिंपी, भागवत मिस्त्री, रमेश तलरेजा, प्रकाश गगवाणी, राजाराम कटारिया, शंकर हसवानी, गणेश शिंपी, आनंद नाथानी, योगेश भागवानी, रवी निकम, रमेश कुकरेजा, घनश्याम हसवानी आदी उपस्थित होते.

थकीत रक्कम भरण्यासाठी 26 पर्यंत मुदत

मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी दि.26 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. 14 अव्यवावसायिक मार्केटमधील गाळेधारकांना भाड्याची रक्कम भरणे शक्य नाही.त्यामुळे 4 पट दंड, शास्ती रद्द करण्याची मागणी गाळेधारकांनी केली.मात्र ही मागणी मनपा आयुक्तांनी मंगळवारी फेटाळून लावली होती. आयुक्तांनी मागणी फेटाळल्यानंतर गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी बैठक घेवून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येवू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 रोजी गाळेधारक उपोषण करणार आहेत. तसेच 27 रोजी मनपाने कारवाई करण्याचा प्रयत्न केल्या जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ.शांताराम सोनवणे यांनी सांगितले.

Copy