गादी कारखान्याच्या आगीत कामगाराचा मृत्यू

0

पुणे : शहरातील विश्रांतवाडी परिसरात सोमवारी सकाळी गादी कारखान्याला लागलेल्या आगीत एक कामगार मृत्युमखी पडल्याची प्राथमिक माहिती अग्निनशमन दलाकडून देण्यात आली, तर मंगळवार पेठेत लागलेल्या आगीत एक दुकान जळून खाक झाले.

विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर भागात असलेल्या गादी कारखान्यास सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत एक कामगार मृत्युमुखी पडल्याचे सागंण्यात येते.

मंगळवार पेठेतील इलेक्ट्रिक पॅनेलच्या दुकानाला सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. या आगीमुळे बाजूला असणार्‍या कोळशाच्या वखारीने देखील पेट घेतला. कोळशाच्या वखारीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग एक तासानंतर आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या 9 गाड्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.