गाड्यांचा वेग मंदावला

0

मुंबई । सोलापूरजवळील दुधनी येथे मालगाडीचे इंजिन आणि 5 वॅगन रूळावरून घसरले होते. त्यामुळे दक्षिण भारतात जाणार्‍या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सोमवारी सुमारे 12 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. तर 4 ते 5 गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली. हा अपघात मुख्य रेल्वे मार्गावर झाला. अजुनही या मार्गाची दुरूस्ती झालेली नाही. या मार्गावरून वॅगन हटवण्याचे काम मंगळवारीही सुरू आहे.