गाडगेबाबा अभियांत्रिकीत व्याख्यानमालेचे आयोजन

0

भुसावळ: दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गाडगेबाबा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. नविन वर्षाच्या पहिल्या शनिवार, रविवार रोजी म्हणजेच 7 व 8 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात जगप्रसिद्ध व्याख्याते भुसावळकरांना वैचारिक मेजवानी देणार आहेत. तसेच परिसरातील श्रोत्यांनी गाडगेबाबा व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह यांनी केले आहे.