गाडगेबाबा अभियांत्रिकीचा राहुल चौधरी ठरला ‘जळगाव श्री’

0

भुसावळ- शहरातील नाहाटा महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाचा राहुल चौधरी ‘जळगाव श्री’ ठरला. आर्थिक पाठबळ किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन नसले तरी केवळ जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर यश मिळवता येते राहुलने मिळवलेल्या यशातून सिद्ध झाले आहे. त्याच प्रमाणे सुमित पाटील यांचा 60 किलो वजन गटात दुसरा क्रमांक आलेला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांची आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
क्रीडा शिक्षक प्रा. योगेश जोशी यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, कोषाध्यक्ष महेशदत्त तिवारी, प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. अ‍ॅकेडेमीक डीन डॉ.राहुल बारजिभे, विभागप्रमुख प्रा.अविनाश पाटील, प्रा.सुधीर ओझा, प्रा.योगेश जोशी यांनी विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयात केला.

Copy