गांधी व शास्त्री यांचे जीवन समाजाला नवी प्रेरणा देणारे

0

रोहयो पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन
नंदुरबार – महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन समाजाला नवी प्रेरणा देणारे असून महात्मा गांधी हे देशाचे प्रगतीचे प्रणेते
होते. त्यांनी केलेले कार्य हे सर्व जगात आदर्श ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो पर्यटनमंत्री जयकुमार
रावल यांनी आज केले. गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जि.प.शिक्षण
विभाग, सलाम मुंबई फॉऊडेशन, राष्ट्रीय सेवा योजना, लायन्स क्लब, रोटरी क्लब नवनिर्माण संस्थेतर्फे कोवळ्या मनावर व्यसनमुक्तीचे
संस्कार घडविणाऱ्या गुरुजनांचा व अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभात पालकमंत्री जयकुमार रावल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, शिक्षणाधिकारी (प्राथ) आर.डी. कांबळे, उपशिक्षणाधिकारी
डॉ. राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी (माध्य) बी.आर. रोकडे, सलाम मुंबई फांऊडेशनचे वरिष्ठ प्र.व्यवस्थापक अजय पिळणकर, रोटरी क्लब
ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन, नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्थेचे अध्यक्ष रवि गोसावी, हैदरभाई नुरानी, डॉ. तेजल चौधरी
आदि होते.

Copy