गांधी विचार संस्कार परिक्षेत शिवाजी हायस्कूलचे यश

0

नवापूर । गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परिक्षा सन 2016-17 या वर्षात घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या गांधी विचार संस्कार परिक्षेत प्रणव कुवर या विद्यार्थ्याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणारे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे: इयत्ता पाचवी- प्रतिक संजय सोनार, प्रणव गूलाबसिंग गावीत, इयत्ता सहावी- रोहन अविनाश पाटील, हर्ष हेमंत पाटील इयत्ता आठवी- गौरांग रविंद्र सांगळे, सुष्मित माणिक गावीत इयत्ता नववी- अभय हितेंद्र दुसाने, सुधांशु भानुदास रामोळे, इयत्ता दहावी- रोहित मुकेश कोकणी, भावेश विजय पाटील.

गांधी विचार व प्रसार करून अमूल्य कार्य केल्याबद्दल केंद्र प्रमुख जी. पी. कोळी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या परिक्षेत शाळेने जास्तीत जास्त विद्यार्थी बसविल्या बद्दल शाळेला प्रमाणपञ देण्यात आले. उपमुख्याध्यापक अनिल पाटील, एम. एस. साळुंखे, बी. आर. पाटील, हरीश पाटील, सतीश लाड, ए. एन. सोनवणे, साविञी पाडवी, संग्रामसिंग राजपूत, आर. के. पाटील, हिंदी विभाग प्रमुख जी. पी. कोळी, हेमंत पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन
गुणवंत विद्यार्थाच्या गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचलन हेमंत पाटील यांनी केले