गांधीधाम -पुरी साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस धावणार

भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने गांधीधाम – पुरी, पोरबंदर-संत्रागाची साप्ताहिक विशेष आणि राजकोट-रेवा दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गांधीधाम-पुरी साप्ताहिक विशेष गाडी
डाऊन 09493 साप्ताहिक विशेष गाडी 16 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी गांधीधामहून 11.05 वाजता सुटेल आणि पुरीला तिसर्‍या दिवशी 2.25 वाजता पोहोचेल. अप 09494 अप साप्ताहिक विशेष गाडी 19 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी पुरीहून 8 वाजता सुटेल आणि गांधीधामला तिसर्‍या दिवशी 11.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भचाऊ, समाखीली, अहमदाबाद, वरोदरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे तसेच सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, खारीयार रोड, कांताबाजी, टिटलागढ, बालनगीर, बारगढरोड, संबलपूर, अंगुल, ढेंकनल, भुवनेश्वर, खुर्दारोड या स्थानकावरही थांबा देण्यात आला आहे.

पोरबंदर-संत्रागाची साप्ताहिक विशेष गाडी
डाऊन 09093 साप्ताहिक विशेष गाडी 19 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी पोरबंदरहून 9.05 वाजता सुटेल आणि सांत्राागाचीला तिसर्‍या दिवशी 6.20 वाजता पोहोचणार आहे. अप 09094 साप्ताहिक विशेष गाडी 18 एप्रिलपुढील आदेशापर्यंत दर रविवारी सांत्रागाचीहून 8.10 वाजता सुटेल आणि पोरबला तिसर्‍या दिवशी 6.35 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जाम जोधपूर, उपलेटा, जेटलसार, गोंदल, भक्ती नगर, राजकोट, विरंगम, अहमदाबाद, आनंद, वरोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चांपा, झारसुगुडा, राउलकेला, चक्रधरपूा, पुरुलिया, आद्रा, बंकूरा, मिदनापूर, खरगपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

राजकोट -रेवा साप्ताहिक विशेष गाडी
डाऊन 09237 साप्ताहिक विशेष गाडी 11 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी राजकोटहून 1.45 वाजता सुटेल आणि रेवाला दुसर्‍या दिवशी 5.15 वाजता पोहोचेल. अप 09238 साप्ताहिक विशेष गाडी 12 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी रेवाहुन 8.55 वाजता सुटेल आणि राजकोटला दुसर्‍या दिवशी 10.40 वाजता पोहोचेल. या गाडीला वाकानेर, सुरेंद्रनगर, विरगम, अहमदाबाद, नाडियाड, आनंद, वरोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, बर्‍हाणपूर, खंडवा, इटारसी, पिपरीया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.