गांजाची तस्करी करणार्‍या दोघांना मुद्देमालासह अटक

0

चाळीसगाव प्रतिनिधी: चारचाकी गाडीत गांज्याची वाहतूक होत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून कळताच ग्रामीण पोलीसांनी सापळा रचत रांजणगाव फाटा येथील स्वामीराज हॉटेल जवळून सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान दोन जणाला अटक केली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव ग्रामीण स्थानकाचे निरीक्षक संजय ठेंगे यांना मध्यप्रदेश येथून एका कारमध्ये शस्त्र व अवैध दारू यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार ग्रामीण पोलीसांनी सापळा रचून रांजणगाव फाट्याजवळून धुळ्याकडून -औरंगाबादकडे जाणार्या हुंदाई इकॉन एमपी- ०९ सीएन- ५६९५ क्रमांकाची गाडीला अडवून तपासणी केली असता. कारमध्ये ८ किलो ४०० ग्रॅम वजनाईतका गांजा आढळून आला. यामुळे पोलीसांनी भिका उर्फ सिंघम इजम शिदोईया ( वय-१९ रा. इंद्रपुर जि. बडवानी राज्य मध्य प्रदेश) आणि पप्पू अंगाशिरा जमरे (वय-२५ रा. तलाव फलिया जि. बडवानी राज्य मध्य प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हा गांजा १,२६००० रूपयांचा असून कारसह एकूण ४ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक संपत आहेर, हवालदार युवराज नाईक, नंदलाल परदेशी, नितीन पाटील ,नितीन आमोदकर, शांताराम पवार, भूपेश वंजारी, गोकुळ सोनवणे, प्रेमसिंग राठोड, बिभीषन सांगळे व हेमंत दुसाने यांच्या पथकाने केली.

Copy