गळफास घेवून दोघांची आत्महत्या

0

खिर्डी । परिसरात ऐनपुर व गोलवाडा येथे गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. ऐनपुर येथील 45 वर्षीय गोपाल कृष्णा महाजन यांनी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. गोपाल महाजन यांच्या खबरी वरुन निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

25 वर्षीय युवकाने संपविली जीवनयात्रा

दुसर्‍या घटनेत येथून जवळच गोलवाडा येथे तापी नदीच्या काठी निंबाच्या झाडाला गळफास घेऊन 25 वर्षीय किरण आंबादास तायडे रा.गोलवाडा याने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. कडू तायडे यांच्या फिर्यादी वरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण कळले नसून पुढील तपास पोहेकॉ अनवर तडवी, पोहेकॉ श्रीराम वानखेडे करीत आहे.