गळचेपीला वैतागून अमित खोपडेंनी दिला पदाचा राजीनामा!

0

धुळे । भारतीय जनता पक्षात अलिकडे प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकार्‍यांची गळचेपी केली जात असून संधी साधूंचे सुसाट-सैराट वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पक्षाची स्थिती खालावत असून ही अधोगती पहावली जात नसल्याने आपण भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा देत असल्याचे अमित खोपडे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात त्यांनी महानगर जिल्हाध्यक्षांना लेखी पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, आपण भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावान कार्यकर्ता आहोत. पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकल्याने आपण भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा सरचिटणीस हे पद प्रामाणिकपणे सांभाळले. मात्र अलिकडे संधीसाधूंचे सुसाट व सैराट वारे वाहू लागले असून अनेक पतीतांना पक्षात पावन करुन घेतले जात आहे. त्यामुळे पक्षात प्रामाणिकपणे काम करणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्याची गळचेपी होत असल्याचा आरोप करत पक्षाचा पाईक म्हणून कार्य करीत राहू अशी ग्वाही त्यांनी या पत्रातून दिली आहे.