गर्दी भोवली : रावेरातील रूपम मॉल अखेर सील : एक लाख 43 हजारांचा सुनावला दंड

मॉलमध्ये 143 ग्राहक नेत सुरू होता व्यवसाय : प्रती ग्राहकांना पाचशे रुपये दंड तर मॉलला दहा हजाराचा दंड : डीव्हीआर केला पोलिसांनी जप्त

रावेर : कोरोना व्हायरसच्या सुपरस्प्रेडरला कारणीभूत ठरलेल्या रावेर शहरातील रुपम शॉपिंग (कापडाचे) मॉल पालिका प्रशासनान सील करीत मॉल मालक प्रकाश ललवाणी यांच्यासह त्याच्या मुलाला रावेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कोरोना नियमांचे उल्लंघण करून व्यवसाय करणार्‍या व्यावसायीकांमध्ये शहात मोठी खळबळ उडाली. कोरोना महामारी सुरू असून अनेक हातावर पोट असणारे कुटुंब घरात थांबुन कोरोना विरुध्द लढा देत आहे परंतु रूपम शॉपिंग मॉलच्या मालकाने शासन नियम पायदळी तुटवत सुमारे दोनशे पेक्षा ग्राहकांना बेकायदा मॉलमध्ये प्रवेश दिला त्यामुळे कोरोना व्हायरसच्या सुपरस्प्रेडला कारणीभुत ठरलेल्याने त्यांच्यावर महसूल नगर पालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शटर बंद करून दुकानात सुरु होती विक्री
रावेर शहरातील रूपम मॉलमध्ये बाहेरुन कुलुप लावून आ मध्ये सर्व कोरोना नियम पायदळी उडवून सर्रास कपड्यांची विक्री सुरू होती. याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच मॉलवर छापा टाकण्यात आला. मॉलचे शटर उघडून पाहताच कामगार सुमारे दिडशे ते दोनशे ग्राहकांना आतमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली करून सर्रास कापड विक्री करत होते. दरम्यान, या गंभीर प्रकारानंतर मॉल सील करण्यात आला.

पोलिसांनी डीव्हीआर केला जप्त
रूपम मॉलला प्रशासनाने सील ठोकण्याची कारवाई तहसीलदार उषाराणी देवगुणे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, भागवत धांडे, प्रमोद चौधरी, सुभाष महाजन, शांताराम पाटील आदी प्रशासकीय टीमने संयुक्त कारवाई केली. रूपम मॉलचा डीव्हिआर ताब्यात घेण्यात आला.

प्रती माणसे पाचशे तर मॉलला दहा हजाराचा दंड
दरम्यान याआधी रावेर शहरातील अमर वॉच व अमर परीधान या दुकानाला सुध्दा सील करण्यात आले. रूपम मॉलने सुध्दा कोरोना नियमांची पायमल्ली केली म्हणून मॉल सील करण्यात आले असून मॉलमध्ये असलेल्या प्रति ग्राहकांना इपाचशे रुपये दंड तर मॉलला दहा हजारांचा दंड करण्यात येणार आहे. दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले.