गरुड महाविद्यालयात वार्षीक पारीतोषिक वितरण उत्साहात

0

शेंदुर्णी । येथील गरुड महाविद्यालयात वार्षीक पारितोषीक वितरण तसेच स्नेह संमेलनाची सांगता नुकतीच करण्यात आली. यावेळी ऐनपूर ता रावेर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंजने, तसेच उपप्राचार्य डॉ.बी.एस. पाटील, गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील, प्रा.आर.जी.पाटील यांच्याहस्ते विविध 52 पारीतोषीकांचे वितरण करणयात आले. यात सपना फासे, गौरव बारी, पौर्णिमा हिवाळे, अक्षय गवळी, शुभम बारी, आरती शिंदे, मनिषा शिंपी, भागवत भोई, शुभांगी फासे यांनी शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक उपक्रमामध्ये विद्यापीठ, राज्यस्तरावर गौरव प्राप्त केला.

यांनी घेतले परीश्रम : वर्षभरात महाविद्यालयात नेत्रदिपक कामगिरी केली स्नेहसंमेलनात नाट्य, नृत्य, रांगोळी, मेहेंदी, संगीत खुर्ची, अंताक्षरी, क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विजेत्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आल. परीक्षणासाठी प्राध्यापक गवारे, प्रा.झंवर, प्रा.वर्षा लोखंडे, प्रा.छाया पाटील, प्रा.रीना पाटील यांनी परीश्रम घेतले. प्राचार्य डॉ.अंजने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेला पागोटे कार्यक्रमानंतर स्नेह संमेलन प्रमुख सुजाता पाटील यांनी तीन दिवस पार पाडलेल्या युवा स्पंदनचा लेखा जोखा मांडत आभार प्रदर्शन केले. डिजेच्या स्वरावली वर तरुणाईकडून जल्लोष करण्यात आला.