गरीब डेंग्यूच्या रुग्णांना महापालिकेतर्फे 10 हजार रुपयांची मदत : आयुक्त सुधाकर देशमुख

0

धुळे- डेंग्यूची लागण झालेल्या गरिब रुग्णांना महापालिकेतर्फे 10 हजारांपर्यत मदत दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. मनपाचे डॉक्टर, नर्स खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन चौकशी करतील व डेंग्यूबाधित रुग्णांना उपचारासाठी प्रेरीत करणार आहेत. जे रुग्ण दारिद्रय रेषखालील असून डेंग्यूच्या शासकीय तपासणीत पॉझिटिव्ह असेल तसेच तो रुग्ण तीन दिवस रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल असेल,अशी रुग्णांची देयके व रिपोर्ट मनपाला सादर केल्यानंतर त्यांना मनपातर्फे ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. सद्यःस्थितीत साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मनपातर्फे ते आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु आजार झाल्यानंतर त्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचा पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. त्यात डेंग्यू आजाराबाबत जनजागृतीसाठी बॅनर लावणे, हस्तपत्रिका तयार करुन त्यांचे वाटप करणे, स्थानिक केबलवरुन माहिती देणे, ट्रॅक्टर माऊंटेड मशीनच्या सहाय्याने फवारणी करणे, छोट्या वाहनाव्दारे फॉगर मशीन चालू करणे आदी कार्यवाई करण्यात येणार आहे. मनपाच्या आर्थिक मदतीच्या योजनेचा लाभ 12 तारखेनंतरच्या रुग्णांना देयक राहिल. लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Copy