गरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आंबेडकर जयंती साजरी

0

पिंपरी: सामाजिक समतेच्या आणि न्यायाच्या शिकवणीतून दिन दलितांचा उध्दार करणाऱ्या महापुरूषाच्या जयंतीनिमित्त गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करून भोसरी चक्रपाणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहे. एक हात मदतीचा हि संकल्पना राबवण्यात आली. माजी महापौर नितिन काळजे आणि नगरसेविका विकास बुर्डे यांच्यामार्फत मदत करण्यात आली. या वेळी टायगर ग्रुप भोसरीचे सदस्य करण पटेकर, निलेश कांबळे, मयूर गायकवाड, एकता मित्र मंडळाचे सहकारी विलास गावडे, विक्कि पांचाळ, विशाल टकले, अमोल शेलार आदी उपस्थित होते.

Copy