Private Advt

गरीबांचे धान्य चोरून टाळुवरचे लोणी खाऊ नका – आमदार भोळे 

दक्षता समितीच्या सदस्यांना देणार रेशन दुकानाचे पालकत्व

जळगाव- मनपा स्तरीय दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी समितीतील सदस्यांना अन्नधान्याचे व्यवस्थित वितरण व्हावे म्हणून प्रत्येकी  10-12 रेशन दुकानांचे पालकत्व देण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.

जळगाव तालुक्यातील रेशन दुकानदार गरीब जनतेला रेशन देत नसल्याच्या तक्रारी तहसीलदारांकडे येत आहेत. त्यांवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र असा अनुचित प्रकार पुढे घडू नये म्हणून तालुक्यातील रेशन दुकान वर दुकानांवर दक्षता समितीचे सदस्य लक्ष ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रेशन दुकानदारांची बैठक बोलावणार 

यासंदर्भात तहसीलदार म्हणाले की, येत्या काळात घरचे सर्व नियम पाळत तालुक्यातील रेशन दुकानदार यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. ही बैठक दोन टप्प्यात बोलवण्यात येणार असून यावेळी या सर्व रेशन दुकानदार यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कोणीही टाळूवरचं लोणी खाऊ नये

राज्य शासन व केंद्र सरकार हे गरिबांना अन्नधान्य मिळावे म्हणून स्वस्त दरात धान्याचे वाटप करत असते. हे धान्य कोणीही चोरायचा प्रयत्न करू नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे समितीचे अध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे म्हणाले. गेल्या काही काळात काही रेशन दुकानदार यांनी बनावट पावत्या बनवून धान्य वाटप दाखवले होते. या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती याची माहिती आज समिती समोर ठेवण्यात आली. याच बरोबर येत्या काळात असे प्रकार होऊ नये म्हणून समितीतील सदस्यांना रेशन दुकानांचे पालकत्व देण्यात येणार आहे.