गरिबांना मदत करताना सेल्फी घेतल्यास तुरुंगवास

0

राजस्थान सरकारचा महत्त्वाचा निर्णय

जयपूर: कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर आणि गरीबांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे आले आहेत. मात्र, ही मदत करत असताना अनेकजण सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. हे लक्षात घेत राजस्थान सरकारने अशी सेल्फी घेण्यावर प्रतिबंध लावत मदत वाटप करताना सेल्फी घेणे हा गुन्हा मानण्यात आला आहे.

भोजन वितरण करताना, किंवा मदत करताना कुणीही सेल्फी घेता कामा नये असे स्पष्ट निर्देश राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत दिले. या बरोबरच भोजन वितरण कशाप्रकारे व्हायला हवेत याबाबतही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येणार्‍या स्वयंसेवी संस्थांना देखील प्रेरित आणि प्रोत्साहित करण्यासही त्यांनी बैठकीत सांगितले. या बरोबरच भोजन वितरण करत असताना लोक सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करतात का, याकडेही काळजीपूर्वक पाहावे असेही ते म्हणाले.

Copy